प्रिया राहुल सुरवसे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेला
आज आपण एका अशा शिक्षिकेबद्दल वाचणार आहोत ज्यांना खरंतर शिक्षिका व्हायचच नव्हतं. पण लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं. त्यांची प्रिय मुलगी आईला परिस्थितिशी झगडताना पाहत होती निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं तिनं कॉम्प्युटर इंजिनीयरला झालेल्या निवडीला डावलून आईचं शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण
आज त्या केवळ शाळेतच नव्हे तर जिल्ह्यात व राज्यातही त्यांच्या विविध उपक्रमांमुळे नावारूपाला आल्या आहेत.जिल्हा परिषद शाळा बेलाटी येथे सध्या कार्यरत असलेल्या प्रिया राहुल सुरवसे त्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमामुळे सबंध राज्याला परिचित आहेत
त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील दोड्याळ येथे नोकरीचा शुभारंभ केला तेथून त्यांची बदली झालेली कळताच गावकऱ्यांनी त्यांची बदली रद्द करण्यासाठी दाखवलेली एकजूट त्यांच्या कामाची पोचपावती देऊन जाते
उत्तर सोलापूर येथील तळे हिप्परगा येथे इंग्लिश भाषा विकासाकरिता व तंत्रज्ञान वाढीकरिता 'saturday is english day. तसेच किशोरवयीन मुलींमध्ये होणाऱ्या शारिरीक बदलाची व मानसिक बदल बद्दल जागरूक करण्याकरिता 'खास माझा तास तुझा 'हा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविला. ज्यामुळे IL@FS कंपनीनं अभ्यासक्रम असलेला प्रोजेक्टर ,कॉम्प्यूटर लॅब त्यांच्या शाळेला दिली
उत्तर सोलापूर मधील तरटगाव अतिशय खराब रस्ता आणि खडतर परिस्थिती परंतु आपल्या लाघवी स्वभावामुळे व हार न मानण्याच्या वृत्तीमुळे प्रिसीजन फौंडेशन, सर फौंडेशन व गावकरी यांच्या मदतीने 3 लाखाचा अविश्वसनिय लोकसहभाग गोळा करून शाळा डिजिटल बनवून शाळेचा पट वाढविला
ज्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत विविध विभागात शाळेची यशोगाथा करिता निवड झाली
त्यांनी शिक्षण क्षेत्रात राबविलेल्या अनेक उपक्रमांच्या योगदानामुळे आत्ता पर्यंत त्यांना विविध संस्था व जिल्हा शिक्षण विभागाने अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.केवळ शिक्षण क्षेत्रातच न्हवे तर सामाजिक व साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग नोंदवला .महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरिता गावातील महिलांना रुखवतीचे सामान बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित केले.केंद्रातील महिलांसाठी कार्यानुभव साहित्य बनवणे कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत .प्रत्येक शाळेत त्या मुलींचे लेझीम पथक तयार करतात तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विद्यार्थी लोकनृत्य स्पर्धा व टॅलेंट हंट स्पर्धा यात जिल्हास्तरावर निवडल्या गेल्या आहेत. जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत त्यांचे उपक्रम बक्षीस प्राप्त ठरले आहे
लग्नानंतर पती ,दोन मुली ,सासू सासरे संसाराची कर्तव्य बजावत त्यांनी आपल्या शिक्षणातही वाढ केली , त्या BA(english)B.ed .MA (eduacation) पदवीधारक आहेत. आपली वाचनाची आवड जोपासत त्या विविध विषयांवर मार्मिक लेखनही करतात. दैनिक सकाळ ,तरुण भारत, पुण्यनगरी, सारथी मासिक,काव्यप्रेमी दिवाळी अंकात त्यांचे लेख व कविता छापून आलेल्या आहेत.त्यांची स्वलिखित ५पुस्तके , प्रातिनिधीक 3 पुस्तके व एक मनस्विनी काव्यसंग्रह प्रकाशित आहे. तसेच विविध शैक्षणिक ,कौटुंबिक,सामाजिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन त्या करतात
कोरोना काळात 'शाळा बंद पण शिक्षण चालू ' यात त्यांनी पारावरची शाळा,स्वाध्याय पुस्तिका वाटप,ऑनलाइन तास उपक्रम हाती घेऊन शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही.जिल्हा परिषद सोलापूर मार्फत कोरोना काळात जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मित मध्ये सक्रिय सहभाग त्यांचा होता
शाळा पूर्व तयारी उपक्रम सेल्फी पॉईंट यामुळे विक्रम दादा अडसूळ व ज्योतीताई बेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय 'शिकू आनंदे' या उपक्रमात त्यांनी आपला ठसा उमटवला.तसेच सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविला जात असलेला 'virtual classroom' लाईव्ह शिकवणे यात त्या इयत्ता पहिली engilsh व इयत्ता दुसरी मराठी भाषेकरिता निवडल्या जाऊन महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळांमधील मुलांशी संवाद साधून ज्ञानाची देवाण घेवाण सौ. सुरवसे करत आहेत
No comments:
Post a Comment